सांगलीच्या सर्वांगीण विकासाला गतीमान करणारा 'संवाद सांगलीसाठी' उपक्रम- पृथ्वीराज पाटील

सांगलीच्या सर्वांगीण विकाचा 'संवाद सांगलीसाठी' हा संकल्प आम्ही केला आहे. सांगली विधानसभा क्षेत्रातील प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करून नागरीकांच्याकडून आलेल्या सुचना एकत्रित करून सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यामधुन संकल्पनामा तयार केला जाणार आहे. '२०१९ ची सांगली विधानसभा मी लढवली. उशिरा उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे तीव्र इच्छा असूनही कमी वेळात सर्व जनतेशी संवाद साधता आला नाही. आपली सांगली भविष्यात कशी असावी याची चर्चा विविध घटकांशी करता आली नाही. सांगली अधिक चांगली करण्यासाठी आपल्या शहर परिसराला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही आरंभला आहे. सांगलीची उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण, आरोग्य, क्रिडा, महिला व युवक कल्याण आदी क्षेत्रात झपाटयाने प्रगती कशी होईल, त्यासाठी काय करता येईल, युवक - युवती, महिला, जेष्ठ नागरिक, विचारवंत बुध्दीजिवी वर्ग या सर्वच घटकांशी सांगलीसाठी मला बोलायचं आहे. यासाठी संवाद बैठकीतून नागरिकांकडून प्राप्त सूचनांची माहिती एकत्रित करुन सांगलीच्या विकासासाठी संकल्पनामा
तयार करण्यात येणार आहे. यासाठी तमाम सांगलीकर नागरिकांनी ९३७०२८८२८६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करत आहोत. यावेळी बिपीन कदम, सनी धोतरे, डॉ. नामदेव कस्तुरे, आसिफ बावा, संतोष भोसले, रविंद्र वळवडे, महावीर पाटील, रामभाऊ पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, सच्चिदानंद कदम, अजय देशमुख,
प्रशांत देशमुख, आयुब निशाणदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post