सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की या गोष्टीकडे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सांगली महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांना काय गांभीर्य राहिले नाही. त्यांच्याकडून अद्याप मोकाट कुत्र्या बाबत ठोस उपाययोजना केली गेली नाही.सध्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांना जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शाळेतील मुलांची अशीच परिस्थिती आहे. महापालिकेने अद्याप याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. याचे कारण काय? गेल्या महिन्यात संजय नगर मधील येथील दोन मुलांच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला हे हल्ले वाढत चालले आहेत. यावर आरोग्य विभाग आणि आरोग्य अधिकारी हे ठोस उपाययोजना का करीत नाहीत? किती दिवस नागरिकांनी सहन करायचे? दोन दिवसांपूर्वी माळी गल्ली येथील एका दीड वर्षाच्या बालकावर पण कुत्र्याने हल्ला केला. अशा गंभीर घटना घडून सुद्धा महानगरपालिका प्रशासन दखल घेत नाही. हे हल्ल्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. मोकाट कुत्र्यांची संख्या भरपूर वाढली आहे. सांगली महानगरपालिकेची डॉग व्हॅन कुठे आहे? सांगलीकर नागरिकांचा महानगरपालिका प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला एक सवाल आहे दोघांचा पत्ता कुठे मिळेल का? सध्या आपली डॉग व्हॅन कुठे आहे? ही शोधायची वेळ आली आहे. आरोग्य अधिकारी कुठे आहेत त्यांचा पण पत्ता मिळेल का? हा सांगलीकर नागरिकांचा त्यांना सवाल आहे. त्यामुळे आयुक्त साहेब आपणास विनंती आहे की, आपण स्वतः लक्ष घालून मोकाट कुत्र्यांबाबत ॲक्शन मोडवर यावे. आणि लवकरात लवकर याबाबत ठोस उपाय योजना कराव्यात. अशी आमची लोकहित मंचची आणि सांगलीकर नागरिकांची कळकळीची विनंती आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी