पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणीसाठी भोसले गार्डनच्या समोर,चव्हाण मळा,पदमाळे फाटा, सांगली. या ठिकाणी आयोजक प्रवक्ते मा. संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली डीपीआयचेअध्यक्ष मा.प्राध्यापक सुकुमार कांबळे सर व शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख मा.शंभूराज काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते पदवीधर व शिक्षक मतदारांचे फॉर्म भरून मतदार नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळेला मा.प्रा. सुकुमार कांबळे सर म्हणाले पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये काही विशिष्ट लोकांचाच सहभाग पूर्वी असायचा परंतु ते आता पश्चिम महाराष्ट्रत विशेष करून सांगलीकरांनी मतदार नोंदणी करून ही मक्तेदारी मोडून काढलीआहे भविष्यात सांगलीतील व महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीमध्ये आमुलआग्र बदल होणार आहेत हे बदल बहुजन समाजाच्या हिताचे नाहीत.आम्हाला बदल करून वंचित, पिचलेल्या दबलेल्या दलित मागास व बहुजन मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे .परदेशात एक मुलगा जरी शिक्षणासाठी असेल तर त्याला जाण्या साठी रेल्वे सुरू केली जाते एवढं त्या ठिकाणी शिक्षणाचे महत्त्व आहे.परंतु आपले सरकार हे 20 विद्यार्थ्यांच्या आत पटसंख्या असेल तरी शाळा बंद करत आहेत हे वस्तुस्थितीला धरून नाही हे बहुजन समाजासाठी घातक आहे.इथल्या शाळा बंद होतआहेत ही वस्तुस्थिती भविष्यात भयानक होईल ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी आपल्या विचाराची लोक विधिमंडळात गेले पाहिजे अशी माहिती प्रा.सुकुमार कांबळे सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व प्रवक्ते संतोष पाटील यांनी जी मतदार नोंदणीचीअभियान राबवले त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. यावेळेला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मा. शंभूराज काटकर म्हणाले की मा. प्रवक्ते संतोष पाटील कायम दिन दलित वंचित व बहुजन समाजासाठी धडपडत असतात व त्यांची आयुष्यात काहीतरी बदल करण्यासाठी कायम त्यांची धडपड चालू असते येणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरून आधार कार्ड,डिग्री सर्टिफिकेट ,फोटो व गॅझेटेड ऑफिसरची सही करून ते निवडणूक कार्यालयात जमा करावे ज्यांना फॉर्म भरून जमत नाही अशाने ऑनलाइन फॉर्म भरून ही आपली नोंदणी करून घ्यावी असे सांगितले. या वेळेला प्रवक्ते मा.संतोष पाटील म्हणाले की 2026 मध्ये पुणे व शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुका होणार आहेत यासाठी सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक पदवीधर मतदार व शिक्षक मतदार नोंदणी करून महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजय करण्याचे असेआव्हान केले. अनमोल पाटील यांनी सर्वांची स्वागत केले शेवटी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी आभार मानले. या वेळेला दत्तात्रय पाटील, महादेव शेळके,रोहित अंगडगिरी,श्रीकांत कोळीगीरी, एम के कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर,स्वप्निल शेटे, सुशांत कदम ,ज्ञानेश्वर केंगार ,प्रदीप भोसले, अनुराधा शेटे, प्रणव शेळके व अनेक जण उपस्थित होते या वेळेला सर्वांनी संतोष पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post