सांगली पोलीस मुख्यालय येथे ३९ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ उत्साहात संपन्न

 



३९ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ च्या स्पर्धा पोलीस मुख्यालय, सांगली येथे दि. १३.१०.२०२५ ते दि. १५.१०.२०२५ च्या कालावधीत पार पडल्या. सदर स्पर्धेत सांगली विभाग, मिरज विभाग, जत विभाग, तासगाव विभाग, विटा विभाग, इस्लामपुर विभाग व पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १५० पुरुष खेळाडू व ५० महीला खेळाडू असे एकूण २०० खेळाडू सहभागी झाले होते. आज दि. १५.१०.२०२५ रोजी ३९ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ चा समारोप समारंभ प्रमुख पाहुणे मा. श्री. विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली आणि मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, यांचे उपस्थितीत पार पडला. सांगली पोलीस क्रिडा स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो - खो, या सांधिक खेळाबरोबरच अॅथलेटीक्स, कुस्ती, ज्युदो, बॉक्सींग, जलतरण, वेटलिफ्टींग इत्यादी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत. या क्रिडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे मा. श्री. विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली, मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांचे हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ च्या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण पुरुष व महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे. सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०२६ च्या पुढील स्पर्धा घेण्याचा बहुमान उपविभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग, जत यांना प्रमुख पाहुणे मा. श्री. विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. आजच्या या समारोप कार्यक्रमावेळी महिलांची संगीत खुर्ची व लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या बक्षीस समारंभ कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रणिल गिल्डा, सांगली विभाग व मिरज विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, सचिन थोरबोले, जत विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, अशोक भवड, तासगाव विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, विपुल पाटील, विटा विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, अरुण पाटील, इस्लामपूर विभाग, पोलीस निरीक्षक आर्थीक गुन्हे शाखा अति. कार्यभार पोलीस उपअधीक्षक (गृह),अरुण सुगावकर, पोलीस मुख्यालय, सांगली, पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व शाखांचे प्रभारी अधिकारी, राखीव पोलीस निरीक्षक, बाळू आलदर, स्पोर्टेस इनचार्ज धनंजय राऊत व पोलीस मुख्यालयकडील स्टाफ, विविध खेळ प्रकारातील पंच व खेळाडू उपस्थित होते. सदर क्रिडा स्पर्धा पार पाडण्याकरीता पोलीस मुख्यालयातील कवायत शिक्षक व अंमलदार यांचे सहकार्य लाभले. यावेळी मोठया संख्येने पोलीस कुटुंबिय, नागरीक व विदयार्थी हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय कडणे यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post