सांगली प्रतिनिधी
सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सांगलीच्या चेअरमनपदी श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे व व्हा. चेअरमनपदी अॅड. एस. पी. मगदूम यांची संचालक
मंडळाच्या सभेत एकमताने निवड करणेत आली. ही सभा श्री. ए. एन. कोळी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सांगली, अध्यासी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
कर्मवीर पतसंस्था ही सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील अग्रनामांकीत व विश्वसनीय पतसंस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या ६४ शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या ठेवी १२४५ कोटी, कर्ज
९५३ कोटी गुंतवणुक ४७६ कोटी आहेत. मागील नफा १५ कोटी ५५ लाख असून संस्थेस अनेक पुरस्काराने सन्मानित करणेत आले आहे. संस्थेचे कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून मोबाईल
बँकींग. NEFT / RTGS SMS बँकींग, मिस्ड कॉल अलर्ट सेवा लॉकर सुविधा देते. संस्थेचा स्वनिधी १३० कोटीच्या पुढे आहे. संस्थेची सभासद संख्या ६७००० आहे. श्रीमती भारती चोपडे या संस्थेच्या जेष्ठ संचालिका आहेत. त्यांनी यापुर्वी व्हाईस चेअरमन म्हणून काम
पाहिले आहे. त्यांना सहकारी संस्थेतील अनेक वर्षे कामाचा अनुभव आहे. अनेक सेवाभावी संस्थावर देखील त्या संचालक म्हणुन काम करीत आहे. अॅड. एस. पी. मगदूम हे संस्थेचे जेष्ठ संचालक असून त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे.
त्यांनी द. भा. सभेच्या लिगल सेलचे चेअरमन तसेच सहकार भारतीचे सांगली शहर अध्यक्ष म्हणुन काम केले आहे. त्यांचा जनसंपर्क अत्यंत चांगला असून यापुर्वी त्यांनी चेअरमन म्हणुन चांगले काम केले आहे. ते
अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थावर पदाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.
स्वागत व प्रास्ताविक संचालक श्री.रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. मागील पाच वर्षात संस्थेने अत्यंत समाधानकारक प्रगती केली असून त्याचे श्रेय सर्व संचालक सभासद सेवक यांच्या कामास दिले. त्यांनी नुतन चेअरमन व्हा. चेअरमन यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या प्रगती साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सर्व सभासद ठेवीदार कर्जदार व सेवकांनी संस्थेचे प्रगतीसाठी योगदान
देणेचे आवाहन केले.यावेळी संस्थेचे संचालक डॉ.अशोक आण्णा सकळे, डॉ.रमेश वसंतराव ढबू, ओ. के. चौगुले, श्री.वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आण्णासाहेब पाटील, संचालिका सौ.
चंदन नरेंद्र केटकाळे, श्री. आणासो दादू गवळी, श्री. बजरंग भाऊसो माळी, श्री. अमोल विनायक रोकडे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसो थोटे इ. उपस्थित होते. मुख्य कार्यकारी
अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम यांनी आभार मानले. यावेळी शुभेच्छा देणेसाठी मान्यवर सभासद व सेवक उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी