सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा नमुना आज पुन्हा आणि पहावयास मिळाला .सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडण्याची मालिकाच सुरू झाली असून ,आजही गारपीर रोडवर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या बंगल्यासमोरच रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडलाय.
याआधीही शंभर फुटी रस्त्यावर डी मार्ट च्या समोर नुकत्याच केलेल्या नव्या रस्त्याला भगदाड पडले होते त्यानंतर त्याच रस्त्यावर दिगंबर मेडिकलच्या समोर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला होता,त्यानंतर तिसरा खड्डा हा अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पडला होता आणि त्यानंतर आता चौथा खड्डा हा या ठिकाणी गारपीर रोडवर पडलेला आहे .हे खड्डे पडण्याला महानगरपालिकेचा बांधकाम विभाग ,ड्रेनेज विभाग तसेच संबंधित ठेकेदारच जबाबदार आहेत असा आरोप लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केला आहे .सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या महापालिका क्षेत्रातील सर्वच नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांचे ऑडिट करावे ,संबंधित रस्त्याला वापरण्यात आलेले मटेरियल कोणत्या क्वालिटीचे वापरले आहे. याचीही तपासणी लवकरात लवकर करावी आणि संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी लावून त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी .अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आहे .