शंभर फुटी सांगली येथील शाहूनगर येथील विद्युत तार हटवण्याची मागणी

सांगली प्रतिनिधी 
सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील, शाहु नगर येथील ३३/११ के. व्ही. विदयुत तारेमुळे होणारे जिवीत व मालमत्ता धोके बाबत. आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी या मागणीचे निवेदन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना शाहू नगर कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते फारूख मुल्ला यांनी दिले,

सांगली येथील शंभरफुटी रोड परिसरातील एम.एस.ई.बी सब सेक्शनचेपिछाडीस म्हणजेच शाहुनगर कॉलनी मध्ये राहणाऱ्या नागरिकांची या ठिकाणी घरे मोठया प्रमाणात झालेले असून दाट लोकसंख्या असलेली वस्ती आहे. सदर ठिकाणी आम्ही
गेली १९८५ सालापासून राहत आहोत. सदर या आमचे वस्तीचे गल्ल्यांचे दोन्ही बाजूने महावितरण विद्युत विभागाने ३३/११ के व्ही ची विदयुत तारे नवीन सन २०२३ साली टाकलेले आहेत. त्यामुळे या परिसराचे सर्व घराचे आजुबाजूने विदयुत तारांचे जाळे निर्माण झालेले आहे. त्यामुळे येथे राहणारे नागरीकाचे व रस्त्यावर वर्दळ करणारे नागरीकांचे जीव धोक्यात आलेले आहेत, यामुळे मोठी दर्घटना होणेची शक्यता आहे. सबब आपणांस विनंती की सदरचे मोठयाप्रमाणे विदयुत प्रवाह करणारी सर्व तारा काढावीत अगर सर्व विद्युत तारा मुख्य शंभरफुटी रस्त्यावरुन वळवण्यात यावेत आणि इतर सुरक्षे करीता संबधीत उपाय योजना करावेत, जेणेकरुन या परिसरातील सर्व नागरीकांचे जीवाची व मालमत्तेची संरक्षण होईल याची दक्षता एम.एस.ई.बी कडून घेण्यात यावी ही या
निवेदनाद्वारे सर्व नागरीकांची विनंती आहे. की  संबधीत कार्यालयास कार्यवहीचे आदेश देण्यात यावेत ही शंभरफुटी, शाहू नगर, सांगली येथील सर्व समस्त नागरिकांची इच्छा आहे, तरी आपण यामधील लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी नम्र विनंती,
या भागातील सामाजिक कार्यकर्ते फारूक मुल्ला अमर दादा पडळकर भाजपा सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष. समीर मोमीन.भाजपा अल्प संख्यक जिल्हा उपाध्यक्ष. लियाकत भाई शेख. सामाजिक कार्यकर्ते शेख साहेब. संतोष कदम.राजु माळगे. शाहिद शेख.गौस पखाली.शकील नंदिकर. मन्सूर अलासे, बाळू भाई बारगीर Ab टेलर इमरान तांबोळी यांच्यासह या भागातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post