ओबीसी एल्गार महामेळाव्याच्या तयारी संदर्भात वीरशैव माळी मंगल कार्यालयात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

सांगली प्रतिनिधी 
 11 ऑगस्ट रोजी सांगलीतील तरुण भारत स्टेडियम वर पार पडणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका गाव तसंच वाडी- वस्त्यांवरील समस्त ओबीसी समाज बांधव आपल्या न्याय हक्कांसाठी आणि पुढील येणाऱ्या पिढीसाठी एकत्र यावा आणि शासनाकडून होणारा अन्याय दूर करण्यात यावा या उद्देशाने चर्चा आणि उहापोह करण्यासाठी आज दुपारी एक वाजता सांगलीतील वीरशैव माळी मंगल कार्यालयामध्ये ओबीसी बांधवांची बैठक पार पडली.
       सदर बैठकीस ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ,आमदार गोपीचंद पडळकर ,महामेळावा नियोजन समितीचे समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने ,समन्वयक तथा माजी महापौर संगीताताई खोत माजी नगरसेवक सविता मदने,विठ्ठल खोत आदी मान्यवरांसह अनेक ओबीसी बांधव पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post