सांगली मदन भाऊ युवा मंच तर्फे लाखाची दहीहंडी -आनंद लेंगरे.

सांगली प्रतिनिधी 
मदनभाऊ पाटील युवा मंचतर्फे एक लाख १०० रुपयांची दहीहंडी बुधवार दिनांक 28 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडीसाठी पारंपारिक वाद्यासह ढोल ताशा, ढोलकीच्या तालावर फेम्स अभिनेत्री सानिका भागवत व जोया खान येणार आहेत. या कार्यक्रमासाठी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आयोजित केली आहे, अशी माहिती मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शितल लोंढे, उदय पाटील, अविनाश पाटील, व युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. 

युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे म्हणाले, सांगली शहरात गेल्या सहा वर्षापासून दहीहंडीचा सोहळा होत आहे. या कार्यक्रमास माजीमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. सांगलीतील तरुण भारत स्टेडीयम येथे सायंकाळी ५ वाजता दहीहंडीचा सोहळा होणार आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सहाहून अधिक गोविंदा संघ सहभागी होणार आहेत. ५० फूट उंचीची दहीहंडी असणार असून छोट्या गोविंदासाठी सेफ्टी बेल्ट असणार आहे. प्रथम बक्षीस एक लाख १०० रुपयांचे असून इतरही आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. पारंपारिक वाद्यासह ढोल ताशा, आकर्षक लाईट, ढोलकीच्या तालावर फेम्स अभिनेत्री सानिका भागवत, जोया खान दहीहंडीच्या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post