सांगली:
बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. घटनांना निषेध करत आंदोलन करण्यात आले. आरोपींना पाठीशी घालणार्या शासनाचा, गृह विभागाचा धिक्काराच्या आणि निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जयश्री पाटील यांनी महिलांना संरक्षण देण्यासाठी अनेक कायदे आहेत, पण त्यांची कडक अंमलबजावणी मात्र होत नाही. ती झाली तर अनेक दुर्देवी घटना घडणार नाहीत, असे सांगून अशा गंभीर घटनांना गांभिर्याने न घेणार्या शासनाचा निषेध केला.
आंदोलानात शेवंता वाघमारे, कांचन कांबळे, वर्षा निंबाळकर, पद्मश्री पाटील, स्वाती सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी, संतोष पाटील, रत्नाकर नांगरे, आनंद लेंगरे, शितल लोंढे, उदय पाटील, प्रकाश मूळके, फिरोज पठाण, उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, अमित लाळगे, मराठा समाजाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, अँड भाऊसाहेब पवार, राहुल मोरे, नितीन भगत, शमाकांत आवटी, संजय कांबळे अक्षय दोडमणी भरत खवाटे तोफिक कोतवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags
सांगली प्रतिनिधी