प्रतिनिधी सांगली
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सन २०१९ च्या निवडणुकीवेळी मला एक संधी द्या अशी मागणी करून माझ्याकडून तिकीट मागून घेतले होते. आता यावेळी माझे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत थांबण्याच्या स्थितीत नाहीत त्यामुळे आपण सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तशी रितसर मागणी केली आहे. जर काँग्रेसने तिकिट न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचे स्पष्ट इशारा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.
श्रीमती जयश्रीताई पाटील म्हणाल्या, सन २०१९ साली निवडणुक लागली त्यावेळी काँग्रेसने मला तिकिट देत असल्याचे सांगितले. त्यावेळी मदनभाऊचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे मी या तिकिटाला नकार देण्याआधीच काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मला सांगितले की यावेळी मला ही संधी द्या पुढच्यावेळी तुम्ही निवडणुक लढा, त्यामुळे मी हे तिकीट पृथ्वीराज पाटील यांना दिले आता पृथ्वीराज पाटील यांनी पैरा फेडण्याची वेळ आली आहे. त्यांनी यावेळी थांबावे आणि मला संधी द्यावी असे श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी सांगितले. काँग्रेसने संधी न दिल्यास आम्ही पुन्हा अपश्न लढणार
काँग्रेस पक्षाचे आम्ही काम करत आहोत. सातत्याने पक्षाच्या कार्यक्रम राबवत आहोत. त्यामुळे पश्न आम्हाला निश्चित संधी देणार आहे. नाना पटोले यांनीही आम्हाला संधी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार बिशाल पाटील यांनीही आपल्या उमेदवारीला हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आपणास निश्चित संधी मिळणार आहे असे त्यांनी सांगितले. पण यामध्ये काही घोळ झाला आणि तिकिट कापले तर मात्र आपण थांबणार नाही थेट अपक्ष लढवणार आहे. मदनभाऊ यांनीही अपन निवडणूक लढवून ती जिंकली होती. विशाल पाटील यांनीही अपक्ष निवडणूक जिंकली आहे आपणही अपश्न लढण्यास मागे-पुढे पहाणार नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी विष्णुआण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रशांत पाटील, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे. संग्राम पाटील.शितल लोंढे. कय्युम पटवेगार. अजित सूर्यवंशी. प्रशांत पाटील मजलेकर. यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी