बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - निशिकांत भोसले-पाटील (दादा) फाळकेवाडीत बांधकाम कामगारांना भांडी वाटप


इस्लामपूर : प्रतिनिधी
     राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. आम्हीही बांधकाम कामगार व यांच्या कुटुंबासाठी आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सुरक्षा व अन्य योजना प्रभावशाली राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी दिला. 

फाळकेवाडी (ता.वाळवा) येथे महाराष्ट्र शासन कामगार विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील, स्वराज्य जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अमित कदम, उपसरपंच संजय फाळके, ग्रामपंचायत सदस्य सचिन काटकर प्रमुख उपस्थित होते.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकार ही विविध योजना राबवून बांधकाम कामगारांना अर्थसाह्य देत आहे. आम्हीही प्रकाश हॉस्पिटलमार्फत विविध योजनामधून बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबावर मोफत उपचार करत आहोत. तरी या आरोग्य सुविधांचा बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा.

यावेळी मंगलाताई जाधव, रुक्मिणीताई जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विनायकराव जाधव, माजी उपसरपंच संदीप काटकर, मोहनराव फाळके, युवा मोर्चाचे पृथ्वीराज काटकर, सागर फाळके, कृष्णात काटकर, अनिल आपुगडे, भास्कर जाधव, सयाजी जाधव, गजानन पाटील, प्रमोद डांगे, नितीन शिंदे, सूरज घनवट यांच्यासह बांधकाम कामगार, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post