किसान नागरी सहकारी पतसंस्था इस्लामपूर हि संस्था निरनिराळ्या उपक्रमांत अग्रेसर पणे सहभागी असते, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अन्य शैक्षणीक क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगीरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करणारी एकमेव संस्था आहे. या पतसंस्थेचा आदर्श इतर संस्थानी घ्यावा असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर शहरातील किसाननगर परिसरात कार्यरत असलेल्या किसान नागरी सहकारी पत संस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलते होते. यावेळी प्रमुख पाहुणे मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, माजी नगराध्यक्ष श्री. सुभाषभाऊ सुर्यवंशी, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन श्री. अमोल चौधरी, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. रामराव पाटील, किसान उद्योग समुहाचे संस्थापक, माजी नगरसेवक श्री. अशोकराव देसाई यांचा सत्कार अनुक्रमे चेअरमन सचिन देसाई, व्हा. चेअरमन भारत कदम, संचालक सर्वश्री जालिंदर कोळी, मनिष जाधव, दत्तात्रय जाधव, अशोकराव गोरे यांच्या हस्ते शाल, फेटा, श्रीफळ, बुके व सन्मानचिंह देवून करण्यात आला
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चेअरमन श्री. सचिन अशोकराव देसाई यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. बजरंग कदम (आण्णा) यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मा. श्री. सुभाषभाऊ सुर्यवंशी, दीनदयाळ सूतगिरणाचे चेअरमन श्री अमोल चौधरी यांनी मनोगते व्यक्त करून संस्थेच्या आगामी प्रभावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माध्यमिक उच्च माध्यमिक, नेट, जीईई तसेच अन्य शैक्षणीक क्षेत्रात विशेष गुणवत्ता व प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थाचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बुके, प्रमाणपत्र व शिल्ड देवून करण्यात आला. महिलांसाठी संस्थेच्या वतीने हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इस्लामपूर सर्व सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री. अशोकराव पाटील, इंजिनिअर आदर्श कदम, शंकरराव देसाई, विश्वास शेवाळे, सुनिल मलगुंडे, मानसिंगराव मदने, जयंत देसाई यांच्यासह सभासद, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संयोजन मॅनेजर रोहित खवळे, संचालक धनाजी लोहार, बाळासाहेब कोकाटे, विशाल काळूगडे, वंदना खोत, भाग्यश्री पाटील यांनी केले. शेवटी आभार मनिष जाधव यांनी मानले.
Tags
सांगली प्रतिनिधी