सांगली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीवाडी परिसरातील नागरिकांना, मतदारांना भेटण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील या सांगलीवाडी मध्ये आल्या होत्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मी उभारणार आहे, लोकसभेला जसे आपण विशाल दादांच्या मागे उभे राहिलात तसे येणाऱ्या निवडणुकीत माझ्याही मागे आपण उभे राहावे असे आवाहन या वेळी जयश्रीवहिनींनी केले. संपूर्ण सांगलीवाडी परिसरात भागा भागात वहिनींच्या मीटिंग लावण्यात आल्या होत्या. यावेळी काही भागातील लोकांनी आपल्या समस्याही मांडल्या यावेळी वहिनींनी त्यांच्या समस्यांना उत्तरे दिली.
यावेळी विजयआबा पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, मा. मदनभाऊ पाटील युवा मंचचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महाबळेश्वर चौगुले, शशिकांत पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, आबा फडतरे, उदय पाटील, आनंदा जामदार, विशाल यादव, योगेश पाटील, सुरेश कोरे, अंकुश साळुंखे, रवींद्र कोळी आदी प्रमुख पदाधिकारी व गावातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी