जयश्रीताई मदन पाटील यांची प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याची सूचना

सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी विष्णू अण्णा भवन सांगली येथे आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांनी येणाऱ्या विधान सभा निवडणुकीसाठी कार्यकर्ते व जनतेतून मी निवडणुक लढवावी अशी इच्छा सर्वांची आहे म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व कार्यकर्त्यांनी आता जोरदार कामाला लागावे अशी सूचना या मीटिंगमध्ये जयश्री पाटील यांनी केली वसंतदादा, विष्णू अण्णा, प्रकाश बापू व मदन भाऊ या सर्वांनी सांगली शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी विकासात्मक प्रचंड कामे केलेली आहेत व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल दादा पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांच्यासाठी जोरदार प्रचार करून सांगली विधानसभा मतदारसंघातून वीस हजाराचे मताधिक्य जनतेने देऊन दादा घराण्यावर प्रेम दाखवले आहे असेच प्रेम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला जनतेने मताच्या रूपातून देऊन सांगली मतदारसंघातून विधानसभेमध्ये पाठवावे असे आवाहन शेवटी जयश्री ताई पाटील यांनी केले यावेळी माझी महापौर किशोर भाई शहा, ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार ,दिलीप पाटील, अशोक मोहिते, अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे ,उत्तम पाटील, दिनकर साळुंखे ,संजय सावंत, अविनाश जाधव, मयूर बांगर इत्यादी कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केले या बैठकीस सांगली मार्केट कमिटीचे संचालक संग्राम दादा पाटील, मंगेश चव्हाण ,उत्तम साखळकर, मयूर पाटील, फिरोज पठाण, संजय कांबळे ,संतोष पाटील, मदन भाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, शितल लोंढे, शमाकांत आवटी, दिलीप पाटील,उदय पाटील, प्रकाश मुळके, सूहास पाटील,इरफान शिकलगार, बाहुबली कबाडगे, कयूम भाई पटवेगार व धामणी अंकली, हरिपूर, पदमाळे नांद्रे, माधवनगर,बुधगाव, बिसूर, खोतवाडी, कर्नाळ, बामनोली, जुनी धामणी या सर्व गावातील व सांगली व कुपवाड शहरातील प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post