डाॅ..पी.आर पाटील मार्गावर ड्रेनेज कामामुळे रस्त्यात रूतला ट्रक लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांची नव्या रस्त्याची मागणी

डॉ. पि.आर. पाटील मार्गावर ड्रेनेजच्या खुदाई कामामुळे रस्ता पूर्ण नादुरुस्त झाला आहे. ड्रेनेज रस्त्याच्या कामामुळे रस्ता पूर्ण उकरलेला आहे.शिवाय या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता आहे .
      आज अवजड वाहतुकीमुळे एक ट्रक ड्रेनेजच्या खड्ड्यामध्ये पलटी झाला. सदर मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. शाळेतील मुलांची ये जा असते.सांगली महानगरपालिकेने सदर रस्त्याची एकदा येऊन पाहणी करावी .ड्रेनेच काम झाल्यामुळे रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे एका बाजूला खचत चाललेला आहे.तरी,महानगरपालिकेने नागरिकांची गैरसोय लवकर टाळावी आणि नागरिकांसाठी रस्ता लवकरात लवकर नवा करावा अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post