सांगली वाडी मध्ये विशाल दादा पाटील यांचे प्रचारार्थ घर टू घर प्रचार

सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सांगलीतील अपक्ष उमेदवार माननीय विशालदादा प्रकाशबापू पाटील यांचे प्रचारार्थ सांगलीवाडी मध्ये घर टू घर प्रचाराची नियोजन करण्यात आले आहे. यावेळी विशाल दादांचे चिन्ह हे लिफाफा (पाकीट)नवीन असल्याने त्याबद्दलची माहिती यावेळी सांगलीवाडीतील मतदारांना देण्यात आली. त्याच बरोबर मतदान मशीन मध्ये 17 नंबरला विशाल दादांची नाव व लिफाफा हे चिन्ह बघून त्यासमोरील बटन दाबून विशाल दादांना सांगलीवाडी तून मोठे मताधिक्य देण्यासाठी सांगली वाडीतील कार्यकर्त्यांनी घर टू घर प्रचाराची मोहीम हाती घेतली आहे. सांगलीवाडी तून विशाल दादांना चांगला पाठिंबा मिळत आहे. 
यावेळी विजयआबा पाटील, दिलीप पाटील, उदय पाटील, शामराव मगदूम, महाबळेश्वर चौगुले, प्रशांत मगदूम, आनंदा जामदार, बाळासाहेब कदम, आनंदा पाटील, मुकुंद हरगुडे, दीपक पाटील, मधुकर पाटील, दत्तात्रय सुतार, शशिकांत पाटील, सचिन पाटील, संदीप पाटील, गजानन पाटील, विशाल पाटील, अमित मुसळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post