खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगली मिरजे विविध ठिकाणी घेतल्या बैठका

सांगली प्रतिनिधी : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी भाजप उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली मतदारसंघात विविध ठिकाणी बैठका घेतल्या. चारसो पार हा नारा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व नेत्यांनी प्रचार करावा. संजयकाका पाटील यांच्या मताधिक्यासाठी यंत्रणा राबविण्यात यावी. प्रत्येकाने घरोघरी जावे, याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. 
चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, ज्येष्ठ नेत्या निताताई केळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या सह प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते. 
सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगली शहरात दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांचे सुपुत्र पृथ्वीराज पवार यांच्या घरी भेट दिली. यावेळी माधव गाडगीळ, जगन्नाथ ठोकळे, उर्मिला बेलवलकर, विशाल पवार, विशाल शिंदे, प्रदीप कांबळे, भारती दिगडे उपस्थित होते. 
सांगलीवाडी येथे माजी आमदार दिनकर पाटील यांच्या घरी भेट दिली. अजिंक्य पाटील उपस्थित होते. 
दुपारी पटेल चौक, जामवाडी, सांगली येथे ज्येष्ठ नेते दिलीप सूर्यवंशी यांच्या घरी भेट देऊन कार्यकर्यांशी चर्चा केली. यावेळी माजी उप महापौर धीरज सुर्यवंशी, नसीमा शेख, इम्रान शेख, रवी सदामते, अजित मिरासदार, बाळू बेलवलकर उपस्थित होते. 
चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांचे निवासस्थानी भेट दिली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हा कार्याध्यक्ष जमिल बागवान, राधिका हारगे, अमित शिंदे उपस्थित होते.  
प्रभाग क्र. ८ कुपवाड येथे आगमन व कार्यकर्ता व नागरिक यांचे समवेत बैठकीस उपस्थित राहिले. माजी नगरसेवक सौ. कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार यांच्या सह नागरिक उपस्थित होते. 
किल्लाभाग, मिरज येथे माजी महापौर सौ. संगीता खोत यांचे निवासस्थानी बैठकी घेतली. सुशांत खाडे, अवधूत शिंदे यांच्या सह ओबीसी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. 
नदि वेस, मिरज येथे विक्रम पाटील यांचे निवासस्थानी बैठकी घेतली. 
पद्मावती पार्क मिरज येथे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे आयोजित "मिसळ पे चर्चा" कार्यक्रमास उपस्थिती. येथे नागरीक व कार्यकर्त्यांशी चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. 
माजी नगरसेवक गणेश माळी यांच्या निवासस्थानी  
नंदनवन कॉलनी, पंढरपूर रोड, मिरज येथे बैठक घेतली. 
चंद्रकांत पाटील यांनी सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत उत्साह वाढविला.

Post a Comment

Previous Post Next Post