ज्योतीताईंना महिलांनी दिला मतदानाचा शब्द : सांगलीत प्रभाग १६ मध्ये संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ घरोघरी संपर्क

सांगली प्रतिनिधी : खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांनी आज सांगलीत प्रभाग क्रमांक १६ मध्ये प्रचार मोहीम राबवली. घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधला.  महिलांनी संजयकाका पाटील यांना मतदान करण्याचा शब्द दिला. 
संजयकाका पाटील यांची मुलगी वैष्णवी, सून डॉ. शिवाणी प्रभाकर पाटील, हरीपूर च्या सरपंच राजश्री तांबवेकर, महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, मनिषा शिंदे, शैलजा पंडित, भाजपचे सुजित राऊत, आनंदा चिक्कोडे, अमित भोसले, विकास आवळे, सुनील जाधव, संजय चव्हाण यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post