शेतकयांची जमिनी लाटणाऱ्या संजयकाकांना धडा शिकवा -अजितराव घोरपडे


सांगली : जिल्ह्यातील सहकारी संस्था संपविण्याचे काम संजयकाका पाटील यांनी केले. गणपती जिल्हा संघासह दोन साखर कारखानेही संपविले. जिल्हा बँकेकडेही त्यांनी मोर्चा वळविला होता. गेल्या दहा वर्षात भाजप व खासदारामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांची जमिनी लाटण्याचा उद्योग करणाºया संजयकाकांना धडा शिकवावा, अशा शब्दात माजी अजितराव घोरपडे यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या हल्ला चढविला.
मिरज पूर्व भागातील एरंडोली, खंडेराजुरी, मल्लेवाडी, शिपूर, डोंगरवाडी, बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी, जानराववाडी, सलगरे, चाबुस्कारवाडी, खटाव, लिंगनूर येथे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका, सभा झाल्या. यावेळी अजितराव घोरपडे बोलत होते. यावेळी उमेदवार विशालदादा पाटील उपस्थित होते. 
घोरपडे म्हणाले की, कर्मकरंट्या खासदारामुळे शेतकºयांना वाईट दिवस आले आहेत. त्यात भाजप शासनाची भर पडली आहे. सहकारी संस्था संपविण्याचे काम खासदार संजयकाका पाटील यांनी केले. गणपती जिल्हा संघासह दोन साखर कारखानेही संपविले. जिल्हा बँकेकडे मोर्चा वळविला होता. पण तिथे मी व विशाल पाटील यांना असल्याने डाव यशस्वी झाला नाही. भाजपमधील अनेकजणांचाही संजयकाकांच्या उमेदवारीला विरोध होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देता कामा नये. सातबाºयाच्या सुरळीतून खासदार बाहेरच पडले नाहीत. शेतकºयांच्या जमिनी लाटण्यातच त्यांना अधिक रस दाखविला, अशी टीका केली.
आदर्श खासदार म्हणून विशाल पाटील काम करतील. शेतकºयांच्या जीवनात बदल घडून जिल्ह्यात विशाल नवीन पर्व सुरू होईल. शेतीच्या प्रक्रिया संस्था उभा करण्यासाठी विशालदादांना साथ द्या. बंडखोरीची प्रथा मिरज पूर्व भागाला नवीन नाही. बंडखोरीला साथ देणे रक्तातच आहे. मिरज पूर्व भाग विशालदादांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिल, असा विश्वास व्यक्त केला. 
विशालदादा पाटील म्हणाले की, जनतेच्या आशिर्वादाला तडा जावू देणार नाही. सांगलीच्या जनतेला अभिमान वाटेल असाच खासदार होऊन दाखवूू. दिल्लीत बोलणारा खासदार हवा. लोकसभेत आवाज उठविला पाहिजे. जो व्यक्ती एक शब्द बोलू शकला नाही, त्यांनी एक रुपयांही दिल्लीतून आणला नाही. त्यामुळेच जिल्हा विकासात मागे पडला आहे. जनतेचे प्रेम पाहून भारावून गेलो आहे. या प्रेमातून उतराई होण्यासाठी आयुष्य खर्ची टाकू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

Post a Comment

Previous Post Next Post