*ानापूर आटपाडी तालुक्यात संजयकाकांना विजयी करण्याचे नारीशक्तीचे आवाहन; गावागावात मतदारांचा वाढता प्रतिसाद

विटा प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी
महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांच्यासह खानापूर आटपाडी तालुक्यातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही तालुक्यातील गावागावात जाऊन नागरिकांना भेटून संजयकाकांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. नारीशक्तीच्या या प्रचार मोहिमेला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी एकत्र येऊन खानापुराणे आटपाडी तालुक्यातील गावा गावात जाऊन विचार यंत्रणा राबवत आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका सांगत आहेत. संजय काकांनी केलेली विकास कामे मोदी सरकारने राबवलेल्या अनेक योजना तिच्या माध्यमातून देशाचा झालेला विकास या सर्व गोष्टी मतदारांपुढे मांडण्यात येत आहेत. याला नागरिकशी वाढता प्रतिसाद देत आहेत. मोदी आहेत म्हणून आपण आहोत अशा पद्धतीने नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे खानापूर आटपाडीतून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.
नागरिकांची भेट घेतली.
 खानापूर- आटपाडी मतदारसंघातील विटा शहरात संभाजीनगर व शाहूनगर परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी विटानगर परिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रतिभाताई पाटील, विटा च्या माजी नगराध्यक्ष मनीषा शितोळे, विटाच्या माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा चोथे, भाजपा खानापूर तालुका महिला अध्यक्ष वैशाली हजारे, भाजपा महिला मोर्चाच्या शुभांगी सुर्वे अन्नपूर्णा हजारे, अंबिका हजारे, संगीता जाधव, निशा भगत, वैशाली धाबुगडे, सविता हूजरे, सविता सूर्यवंशी, अश्विनी देशमुख विटा परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post