विशाल पाटील यांची उमेदवारी ही थांबलेल्या विकासाची चाके पुन्हा सुरू करण्यासाठी - जयश्री ताई पाटील

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मा. विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ काल बुधगाव येथील सिद्धेश्वर मंदिरातून देवाच्या आशीर्वाद घेऊन प्रचारास सुरुवात केली. विशाल दादा ची उमेदवारी ही थांबलेल्या विकासाची चाके पुन्हा सुरू करण्यासाठी आहे. शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या समस्या विशाल पाटील यांना माहित आहेत . ते या समस्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. म्हणून आपण सर्वांनी आज विशाल दादा पाटील यांच्या मागे राहिलं पाहिजे.आज आपले चिन्ह नवीन आहे. नवीन चिन्हांची माहिती घरातील प्रत्येक मतदाराला सांगितली पाहिजे.जास्ती जास्त मतदान आपण करून घेतलं पाहिजे. असे आवाहन यावेळी जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील यांनी केले.
यावेळी माननीय मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे आनंदराव काका पाटील बाळासाहेब पाटील निवास पाटील प्रवीण पाटील अनिल डुबल राम खुटे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post