अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहा मध्ये जयश्री ताई पाटील यांच्या उपस्थितीत भव्य बैठका संपन्न

सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माननीय विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहा मध्ये जयश्रीवहिनी मदन भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत भव्य बैठका संपन्न झाल्या. यावेळी बोलताना जयश्री वहिनी म्हणाल्या, विशालदादांची उमेदवारी ही सांगली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक उमेदवारी असून प्रत्येक नागरिक हा मीच विशालदादा पाटील म्हणून तळागाळात काम करत आहे. वातावरण अतिशय अनुकूल आहे. तरीसुद्धा गाफील न राहता विशालदादांचे चिन्ह बंद पाकीट (लिफाफा) सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची काम आपण करावे असे आवाहन केले. वसंतदादा घरान संपवण्याचा घाट विरोधकांनी घातला असून वसंतदादा घरांन संपणार नाही, आम्हाला लढाईची सवय आहे, रडायची नाही. कितीही विरोध झाला तर जनसेवेचा वसा आम्ही सोडणार नाही. शेवटपर्यंत लढू आणि जिंकू. आज घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मान सन्मान मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. तेच संविधान आज धोक्यात असून संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार विशालदादा पाटील यांनाच मतदान करा असे आवाहन केले. येणाऱ्या सात तारखेला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडा व बंद पाकीट (लिफाफा) या चिन्हा समोरील बटन दाबून विशालदादांना मोठे मताधिक्य द्या असे आवाहन केले.
यावेळी प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रकाश मुळके, वर्षाताई अमर निंबाळकर, शेवंताताई वाघमारे, अशोक मासाळे, यशवंत माळी राजू मुळे यांचे टिंबर एरिया मर्चंड असोसिएशन या ठिकाणी बैठका पार पडल्या या बैठकीला भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post