सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026 च्या निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये वार्ड क्रमांक 19 मध्ये भारतीय जनता पार्टीने काही उमेदवारांना काही गंभीर आजार झाले आहेत ते नागरिकांमध्ये येऊ शकत नाही, मतदाराबरोबर बोलू शकत नाही, नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांचे मतदारांचे दुःख भावना कसंकाय समजू शकणार त्यामुळे भविष्यात अशी व्यक्ती निवडून आले की नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते व अशा उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे वार्ड क्रमांक 19 मध्ये भाजपचे अनेक चांगले पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भाजपकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती, परंतु त्यांचा विचार न करता हे गंभीर आजार असणाऱ्या कधी न बोलू शकणाऱ्या उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वार्ड क्रमांक 19 मध्ये लंगड्या घोड्यावरती रेस लावली आहे असे सर्वत्र वार्ड क्रमांक 19 मधील मतदार बोलू लागले आहेत असं वक्तव्य प्रवक्ते मा. संतोष पाटील यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आपल्या भावना व्यक्त करून चारही उमेदवारांना निवडून द्यावे असे आव्हान केले. या वेळेल वार्ड क्रमांक 19 मधील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येकी दोन दोन उमेदवार हाताच्या व तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आहेत त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आव्हान केले.या वेळेला माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे उमेदवार मा युवराज गायकवाड व मा.सुरेश बंडगर, मा. गजानन मिरजे, सौ कांचन भंडारे यांनी आपल्या भावना व्यक्त करून आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आव्हान केले. यामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये अ मधून सौ कांचन मस्तान भंडारे यांचे चिन्ह आहे हात,ब मधून बंडगर सुरेश लक्ष्मण यांचे चिन्ह आहे तुतारी, क मधून सौ मिरजे सविता गजानन यांचे चिन्ह हे हाताचा पंजा, व ड मधून गायकवाड युवराज शिवाजीराव यांचे चिन्ह आहे तुतारी यांना भरगोस मताने निवडून द्यावे अशी विनंती प्रवक्ते मा. संतोष पाटील यांनी केले.या वेळेला, प्रा.नंदकुमार सुर्वे, रामभाऊ पाटील, एड.श्रीकांत वांडरे,चंद्रकांत जगताप ,राजेंद्र चव्हाण,ज्येष्ठ चित्रपट कलावंत अनिल नीवटे, सर्जेराव गायकवाड,बाळू पाटील प्रकाश खरगे, संविता खरगे, सुनिता राऊत,प्रियंका पाटील, संगीता नांगरे, सुनील फादर,भागातील अनेक नागरिक कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी