सांगली प्रतिनिधी
मिरज येथील काँग्रेस पक्षाचे माजी महापौर किशोर जामदार, भाजपचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वी अंकुश कोळेकर यांच्यासह मिरज शहरातील भाजप काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाचे संकेत दिले,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक जाहीर होतात भाजप काँग्रेस पक्षातील दिग्गज माजी महापौर व उपमहापौर सह अनेक नगरसेवक राष्ट्रवादी (अजित पवार गट )काँग्रेसच्या पक्षात प्रवेश केल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे, काही कारणास्तव अन्य माजी नगरसेवकांना व पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांना भेटण्यासाठी जाता आले नाही, पण भविष्यात त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे,
यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडी, महापालिका शहर जिल्हाध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते,