सांगली प्रतिनिधी
राज्या सह सांगली जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिले,
राज्य सह सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात
सापडले आहेत. मे महिन्यापासून सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शिराळा तालुक्यात धुळवाफ पेरणीच झाली
नाही, त्यामुळे भात, भुईमूग व मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जत, आटपाडी, तासगाव,
कवठेमहांकाळ व पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळिंब यासारख्या फळबागांची पूर्वमशागत करून
सेटिंग अवस्थेत (फळधारनेत) असताना शेतामध्ये पाणी साचून बागायती शेतीचे पाऊसामुळे प्रचंड नुकसान
झाले आहे. सोयाबीन पिके कुजून बाद झाली आहेत, तसेच रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल झाला
आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खालील मागण्या शासन दरबारी सादर करीत आहोत
मागण्या :
राज्यासह सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी करावी. जिरायती शेती पिकांसाठी हेक्टरमागे ९ लाख रुपयांची मदत द्यावी.
बागायती शेती पिकांसाठी हेक्टरमागे १.५ लाख रुपयांची मदत द्यावी.
फळबाग पिकांसाठी हेक्टरमागे २ लाख रुपयांची मदत द्यावी. ओल्या दुष्काळामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील
एका सदस्याला शासकीय नोकरी दयावी. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेच्या वतीने करण्यात आली, यावेळी अमोल काळे श्रीधर करडे, सुरेश टेंगले, विशाल पाटील ,अविनाश जाधव, विशाल शिंगाडे, प्रकाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते,
Tags
सांगली प्रतिनिधी