१. औद्योगिक क्षेत्रातील योगदान
श्री. रावसाहेब पाटील हे सांगली येथील स्वदेशी औषध उद्योग समूहाचे संस्थापक असून, त्यांनी औषध व्यवसायात
उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वदेशी फार्मास्युटिकल्स ही आयएसओ 9001:2008 मानांकित कंपनी असून
सुमारे १५० ब्रँड्सचे औषध वितरण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केले जाते.
डी. फार्मसी शिक्षण घेत असताना त्यांनी रिटेल मेडिकलपासून सुरुवात करून नियोजन, धाडस व दूरदृष्टीच्या बळावर
औषध उत्पादनात मोठी भरारी घेतली.
सिंबायोसिस फार्मास्युटिकल्स या सहकारी औषध प्रकल्पाचे संस्थापक व्हाईस चेअरमन, येथे सिपला, लुपिन, ओकासा
यांसारख्या नामांकित कंपन्यांचे औषध उत्पादन केले जाते.
२. सामाजिक कार्य
स्वदेशी ट्रस्टच्या माध्यमातून - केमिस्ट गौरव पुरस्कार, मोफत औषधोपचार, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबिरे
यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान जपले आहे.
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाचनालयाच्या स्थापनेसाठी भक्कम पाठबळ दिले.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी सदस्य म्हणून अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक.
महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सध्याचे सदस्य म्हणून कार्यरत.
दक्षिण भारत जैन सभा या शिखर संस्थेचे माजी चेअरमन असून विद्यमान केंद्रीय उपाध्यक्ष आहेत त्यांच्या
अध्यक्षतेखाली सांगली येथे भव्य शताब्दी अधिवेशन आयोजित करण्यात आले.
३. शैक्षणिक योगदान
डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी (D. Pharm, B. Pharm, M. Pharm, PHD) या नामांकित संस्थेचे
संस्थापक चेअरमन, औषधशास्त्राच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक
भक्कम व्यासपीठ उभारले आहे.
महावीर स्टेट अकॅडमी, इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेचेही ते संस्थापक चेअरमन आहेत. येथे ई-लर्निंगसारखी
आधुनिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
-लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली या शहरातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत. या संस्थेच्या
३४ शाखांमधून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
Tags
सांगली प्रतिनिधी