ईश्वरपुर/प्रतिनिधी
ईश्वरपुर शहराचे नामकरण उरुण- ईश्वरपुर असे व्हावे यासाठी दि.१ऑगस्ट पासुन साखळी उपोषण सुरु आहे,या उपोषण स्थळी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी भेट दिली.ईश्वरपुर शहराचे उरुण-ईश्वरपुर असे नामकरणाचा शासन आदेश पुढील आठवड्यात काढणार असल्याचा शब्द उपोषणकर्तांना व शहरवासियांना दिल्याने उरुण व शहरात समाधानाचे वातावरण पसरले.
यावेळी अजितदादा पवार म्हणाले,ईश्वरपुर शहराचे नामकरण उरुण-ईश्वरपुर व्हावे ही रास्त मागणी असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना.चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाबाबत सकारात्मक विचार केला आहे,पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मी स्वत:, ना.चंद्रकांत पाटील व महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयात एकत्रीत बसुन उरुण ईश्वरपुर असा नामकरणाचा आदेश काढला जाईल,उरुण या शहराची ओळख आहे,ती कायम राहील याची काळजी करु नका.
यावेळी उरुण ईश्वरपुर नगरपरीषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा),माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील,संजय कोरे,केदार पाटील,
शंकरराव उर्फ बाळासाहेब पाटील (धनी), संजय पाटील, शंकर पाटील, भास्कर मोरे, महेश मोरे, बाबुराव मोरे, डॉ.अतुल मोरे, माणिक मोरे, रजनीकांत मोरे, प्रताप मोरे ,जयवंत मोरे ,मानसिंग पाटील एम जी पाटील ,अजित पाटील ,उमेश जाधव, दादासाहेब पाटील, संजय पाटील ,बापूसाहेब पाटील, साहेबराव मोरे,बाबुराव शेजवळे ओमकार पवार, प्रकाश जाधव, दिलीप पवार आबा व उरुणतील नागरिक व समस्त मोरे भावपणा आदिसह अन्य मान्यवर शहरवासिय उपस्थित होते.
Tags
ईश्वरपूर प्रतिनिधी