कार्यसम्राट.......लोकप्रिय आमदार सुधीर दादा गाडगीळ


आज सांगलीचे आपले लोकप्रिय आमदार माननीय सुधीर दादा गाडगीळ यांचा वाढदिवस... प्रथमत: त्यांना
वाढदिवसाच्या आरोग्यपूर्वक खूप खूप शुभेच्छा.. तसा सुधीर दादांचा आणि माझा परिचय ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यावरच जास्त झाला. त्यापूर्वी सांगलीतले एक प्रतिथयश सराफी व्यावसायिक म्हणून मी त्यांना
ओळखत होतोच. पण दादा भारतीय जनता पक्षाचे  जिल्हाध्यक्ष झाल्यावर मात्र राजकीय कामातून आमची खूप चांगली ओळख आणि मैत्री झाली. 
           त्यानंतर सांगलीचे सलग तीन वेळा ते आमदार झाले आणि माझे भाग्य असे या त्यांच्या तीनही निवडणुकांच्या कामात प्रसिद्धी प्रमुख म्हणून मी काम केले. त्यामुळे या तिन्ही विजयी निवडणुकीच्या प्रत्येक छापील पत्रकावर
आणि वृत्तपत्र जाहिरातीवर प्रकाशक म्हणून माझे नाव होते. हा माझा आयुष्यातील एक आनंदाचा भाग आहे.
गेल्या निवडणुकीत काही महिने आधी सुधीर दादांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.
हा त्यांचा निर्णय भारतीय जनता पक्षातील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसह खेळाडू, कलाकार, पत्रकार, व्यापारी, कोणतेही आरोप करता आले नाहीत.. त्यामुळे विरोधकांकडे दादांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी कोणताही
मुद्दा नव्हताच..  सांगलीतील सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक या सर्व क्षेत्रातील लोकांच्या
सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना एक धक्का  होता.  त्यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर केवळ भाजपचेच मतदार नव्हेत तर अगदी सर्व विरोधी पक्षाला मानणारे मतदार आणि नेत्यांनी सुद्धा सुधीर दादांना वैयक्तिक भेटून तुम्हीच आमदार म्हणून निवडणूक लढवली पाहिजे असे सांगितले होते.


आणि यातच सुधीर दादांच्या
अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा परिचयराज्यातील नेतृत्वापासून सर्वसामान्य कार्यकत्यांना झाला. गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार म्हणून काम करत असताना सुधीर दादांनी फक्त सांगली
आणि सांगली मतदार संघाचा विकास हे ध्येय ठेवून काम केलेले आहे. काम करत असताना त्यांनी कोणताही पक्षभेद, जातीभेद, आणि धर्मभेद पाळला नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये सातत्याने सर्व जाती-धर्माच्या पक्षाच्या
सर्व सामान्य नागरिकांची कायम वदळ असते.
हे मुख्य म्हणजे आमदार म्हणून ते नागरिकांना सहजच भेटू शकतात हे आता प्रत्येक सांगलीकरांना माहिती झालेले आहे. राजकारणा व्यतिरिक्त समस्या सोडवणे आणि त्यांना मदत करणे यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संस्थांमधून त्यांनी
असंख्य लोकांना आरोग्य विषयक मदत आजपर्यंत केलेली आहे. सुधीर दादा ज्याप्रमाणे सांगलीमध्ये लोकप्रिय आहेत तसेच, विधानसभेमध्ये सुद्धा सर्वपक्षीय आमदारांच्या मध्ये  त्यांचे उत्तम वैयक्तिक संबंध आहेत.
मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस,
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या बरोबर सुद्धा त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे सुधीर दादा एखादे काम घेऊन त्यांच्याकडे गेले आहेत आणि ते झाले नाही असे होत नाही.  सुधीर दादांचे शिक्षण सातारा
सैनिक शाळेत झालेले आहे. त्यामुळे सैन्य दलातील सुद्धा मोठ्या पदावरील असंख्य अधिकाऱ्यांशी त्यांचे
मित्रत्वाचे संबंध आहेत. गेल्या तीनही निवडणुकांमध्ये विरोधकांना त्यांच्यावर नुकत्याच झालेल्या
निवडणुकीत सुधीर दादा विक्रमी  मताने निवडून आले यातच त्यांची लोकप्रियता दिसून येते. अत्यंत साधे आणि हसतमुख  व्यक्तिमत्व, समोर कामासाठी भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नाराज न परत न पाठवणे ही त्यांची कामाची खास पद्धत आहे.

सर्वच कार्यकर्त्यांशी त्यांचे
वैयक्तिक आणि जिव्हाळ्याचे संबंध
आहेत त्यामुळे कोणताही कार्यकर्ता
त्यांना सहज आपल्या अडचणी सांगू
शकतो. गेल्या दहा वर्षात सुधीर दादांनी
सांगली मतदारसंघात असंख्य विकास
कामे केलेली आहेत, आणि मला
विश्वास आहे की पुढील पाच वर्षात सुद्धा
सांगली विधानसभा मतदारसंघासाठी
अजूनही खूप भरीव कामे त्यांच्याकडून
होतील. आमदार सुधीर दादा गाडगीळ
यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा
हार्दिक शुभेच्छा
                                               

                                                                         केदार खाडिलकर

Post a Comment

Previous Post Next Post