३९५ मावळे शिवजयंती निमित्ताने करणार रक्तदान, महाआरोग्य शिबिराचेआयोजन - राज्य प्रवक्ते संतोष पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंतीच्या निमित्ताने वारणा मंगल कार्यालय, वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली येथे दिनांक एक मार्च रोजी वार शनिवार सकाळी १० ते ४ या वेळेत स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान व महाआरोग्य शिबिर घेण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंतीनि मित्त ३९५ मावळे रक्तदान करणार आहेत त्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे
 तसेच सांगली जिल्हयातील गोरगरीब गरजू यांना विविध आजाराने ग्रासले आहे अशा नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी उपचार मोफत औषध दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात येणार आहे.
तसेच सर्व निदान आरोग्य शिविर मध्ये कॅन्सर, डोळ्याचे हाडाचे, पोटाचे, हृदयाचे किडनीचे लिव्हर लहान मुलांचे महिला वयोवृद्ध पुरुष व विविध आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर बोलवले आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील व शहरातील सर्व तमाम नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राज्य प्रवक्ते  संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post