सांगली प्रतिनिधी
17 ते 27 जानेवारी दरम्यान सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंड वर पार पडणाऱ्या श्री राम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यास मंत्रपुष्पांजली सह धार्मिक पद्धतीने पूजा करून श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वज उभारून शुभारंभ करण्यात आला. तर यावेळी परमपूज्य श्री बजरंग झेंडे महाराज, परमपूज्य श्री गुरुनाथ कोटणीस महाराज,परमपूज्य श्री दीपक नाना केळकर महाराज, परमपूज्य श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी,श्री प्रसाद चितळे, सतीश मालू दिलीप वग्यानी,अरविंद कुलकर्णी, विनोद घोडावत, नरेंद्र भाई जानी, नितीन झंवर, कीर्तीभाई कोठारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी वृंदावन मधून आलेल्या संत महंतांच्या मुखातील मंत्रोच्चाराने आणि टाळ मृदंगाच्या गजराने, जय जय राम कृष्ण हरीच्या नामघोषाने सर्व वातावरण भक्तिमय व पवित्र झाले होते. सदर कार्यक्रमासाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, श्रीराम कथा ज्ञानयज्ञाचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, अध्यक्ष प्रमोद मालू, विश्वासराव गवळी, सचिव लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे पाटील, ओमप्रकाश झंवर,अरबी पाटील, स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके, रामनिवास बजाज, शितलनाथ पाटील, विजय संकपाळ, प्रमोद लाड, शांतिनाथ कांते, हार्दिक सारडा,प्रकाश जाधव,सुरेश हिरदुग्गी, अरुण गतारे, अरुण वाघुले सुरेंद्र बोळाज, राजकुमार सावळे, सुहास पाटील, शंकरराव पोतदार सावकार शिराळे, यांच्यासह अनेक मान्यवर आणि सर्व जाती धर्मातील नागरिकांसह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
सांगली प्रतिनिधी