३५ वर्षे मूलभूत प्रश्नांवर कार्यक्षमता का दाखवली नाही -निशिकांत भोसले-पाटील यांचा सवाल

 

इस्लामपूर / प्रतिनिधी

गेले ३५ वर्षे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना मतदार संघातील मूलभूत प्रश्नांसह  शेतकर्‍यांसाठी अत्यावश्यक असणारे पाणंद रस्ते, इस्लामपूर शहरातील एमआयडीसीचे आधुनिकरण, आष्टा येथे एमआयडीसी, आष्टा येथील नायब तहसील कार्यालय, आशा अनेक प्रश्नांवर कार्यक्षमता का दाखवता आली नाही, असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी उपस्थित केला.


ढवळी येथे ३६ लाख, फार्णेवाडी (शिगाव) येथे ३६ लाख, नागाव येथे १८ लाख, काकाचीवाडी येथे १८ लाख व मर्दवाडी येथे १८ लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चा  तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.


निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, आ.जयंत पाटील हे अनेक वर्षे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहेत. तसेच त्यांनी राज्य मंत्रीमंडळात मोठी पदे भूषवली आहेत. असे असताना त्यांना मतदारसंघातील अनेक गावातील अंडर ग्राऊंड ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, अंतर्गत रस्ते करता आले नाहीत. मोठे उद्योग मतदार संघात आणून तरुणांना रोजगार देता आला नाही. चांदोली धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावता आले नाहीत. ते शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवता मग ते ऊसदर कोंडी फोडण्यात का मागे असतात, याचे उत्तर त्यांनी द्यावे.


यावेळी ढवळी येथे माजी सरपंच शरद पाटील, सचिन पाटील काका, माजी सरपंच जगन्नाथ पाटील,  राहुल पाटील,राहुल लोंढे, वैशालीताई पाटील, सुजाताताई कोळी, हेमंत कुलकर्णी, अमित कदम, नितीन कांबळे, संभाजी जाधव, उत्तम वायदंडे, बाबूराव सुतार, श्रीकांत नलवडे, बाजीराव पाटील, हेमंत पाटील, संदीप पाटील, माजी सरपंच सुवर्णाताई पाटील, पोलीस पाटील संगीताताई चौगले, गजानन पाटील, ब्रम्हाजी पाटील, डॉ.संभाजी तळप, पंडित लोंढे, नितीन बामणे, अनिल सरदेशमुख तर काकाचीवाडी येथे उपसरपंच नितीन शिंदे, महादेव शिद, प्रमोद गावडे, आनंदराव डाळे, संतोष घनवट, संतोष खोत, मारुती खोत, मेजर खोत, दिलीप खोत, सुशांत साखरे, सूरज घनवट, प्रकाश सराफदार, रघुनाथ गावडे तसेच फार्णेवाडी (शिगाव) पोपट खोत, उत्तम फार्णे, धोंडीराम खोत, तानाजी खोत, उदय खोत, शिवाजी खोत, श्रीकांत खोत, विजय नांगरे, गजेंद्र नांगरे, रत्नदीप खोत, मनोज नांगरे, संजय साळुंखे, सूरज साळुंखे तसेच नागाव येथे रणजित मगर, सर्जेराव पाटील, सहदेव पाटील, विनायक माने, आशितोष स्वामी, सौरभ मगर, महादेव पाटील, पोपट पाटील, संदीप पाटील, योगेश जंगम, पांडुरंग शिसाळ, अनिल पाटील व मर्दवाडी येथे सदाशिव देशमुख, वसंत पाटील, विश्वास पाटील, दीपक पाटील, अमोल पाटील, विश्वजीत पाटील, संभाजी पाटील, प्रकाश देशमुख, शिवाजी माळी, गोविंद पाटील, बाजीराव खुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post