महाविद्यालयीन युवतीला लग्नाची आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित शाहिद मुजावर पोलिसांच्या ताब्यात

सांगली प्रतिनिधी 
संशयित शाहिद मुजावर यांनी शालेय शिक्षणापासून असलेल्या ओळखीचा आणि परिस्थितीचा फायदा घेऊन लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सांगली शहरातील लॉज आणि वेगवेगळ्या कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शाहिद इकबाल मुजावर ( वय १९, रा. सम्राट व्यायाम मंडळानाजिकचा परिसर ) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती आणि संशयित शाहिद मुजावर शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखतात. पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन संशयिताने तिच्याशी अधिक जवळीक केली. तिला लग्नाचे अमिष दाखवून लॉज आणि वेगवेगळ्या कॅफेमध्ये येण्यास भाग पाडून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने शाहिद मुजावर याने तिला दि. ७ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर रोडवरील कुस्ती आखाड्या जवळ असलेल्या एका लॉजमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणीही त्याने जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. काल दिनांक सात रोजी कोल्हापूर रस्त्यावरील लॉज समोर मुलीचे नातेवाईक व तरुण कार्यकर्त्यांनी लॉज समोर या तरुणाची दुचाकी मोटर सायकलची मोडतोड केली होती, 
या घटनेनंतर पीडित युवतीने संशयित शाहिद मुजावर याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सांगली शहर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post