आष्टा : प्रतिनिधी
इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील कारंदवाडी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या समर्थकांनी भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष व इस्लामपुर विधानसभा भाजपा निवडणुक प्रमुख निशिकांत भोसले- पाटील (दादा)यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश केला.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आ.जयंत पाटील यांचे विश्वासु सहकारी व माजी जिल्हा परीषद सदस्य संभाजी कचरे यांचा भाजपा व स्थानिक विकास आघाडीने दारुण पराभव करत सत्ता काबीज केली होती.हा पराभव आ.जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात होता.आता स्वत: च्या पक्षातीलच प्रमुख पदाधिकारी यांनी थेट निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पक्षप्रवेश केल्याने हा दुसरा धक्का मानला जात आहे.
यावेळी कारंदवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष विकास हाके,विवेकानंद उर्फ पोपट हाके, जेष्ट नेते संभाजी दादू हाके,तुलशीदास काशीद,शामराव कामिरे,लकी हाके,युवा नेते
प्रसन्न देवकाते,साजिद मुलानी,सिंकदर मुलानी,विजय हाके आदिसह अन्य आ.जयंत पाटील गटाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले गेल्या ३५ वर्षातील सत्ता सदसदविवेक बुध्दीने मतदार संघाच्या विकासासाठी वापरली असती तर आज आपला मतदार संघ देशाच्या नकाशात विकासाचे माॅडेल म्हणुन ओळखले गेले असते,येथील जनतेचे मोठे दुर्दैव आहे.येथील जनता आज ही दशहती व हुकुमशाहीखाली आहे,ही संस्कृती मोडुन काढण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बोटामध्ये लोकशाही ची मोठी ताकत दिली आहे.तुम्ही येणार्या निवडणुकित हि ताकत लोकशाही मार्गाने वापरुन बदल घडवा,येथील प्रत्येक नागरीकाला सन्मानाची,न्याय वागणुक मिळेल,भावाभावातील दरी कमी होईल,समाजा समाजातील तेढ संपेल,धर्माधर्मातील वाद संपतील,राज्यातील महायुती सरकार मागे ठामपणे उभा राहावा भविष्यातील सर्व दिवस प्रत्येक नागरीक व महीला भगिनींना सन्मानाचे येतील.
यावेळी भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत म्हणाले,निशिकांत भोसले- पाटील (दादा) हे नेतृत्व सामाजीक चळवळीतुन पुढे आले आहे,संवेदशील व भावनाप्रधान असे हे नेतृत्व आहे,कारंदवाडी गावच्या विकासासाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख इतका निधी निशिकांतदादांच्या माध्यमातुन गावच्या विकासासाठी आला हा खर्या अर्थाने निशिकांतदादांनी केलेला गावचा सन्मान आहे,भविष्यात मतदार संघातील विकासाचे माॅडेल म्हणुन आपले गाव विकसीत करण्याचा मानस निशिकांतदादांचा आहे,आजच्या पक्ष प्रवेशाने निशिकांतदादांच्या विचाराला अधिक बळ येणार आहे,येणार्या निवडणुकीत जनतेने साथ द्यावी आणि आपला हक्काचा नेता आमदार करावा.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जेष्ठ नेते बाळासाहेब कबाडे ,वाळवा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष अनिल सरदेशमुख,प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचे संचालक दिंगबर ठाणेकर, कारंदवाडी भाजपा अध्यक्ष्य सदाशिव यादव,ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे युवा नेते विजय हाके, अनिल सावंत, अजित वाडकर, स्वरूप लवटे, महादेव हाके, रुबाब मुलाणी लक्ष्मण सावंत सतीश हुबाले आदिसह अन्य मान्यवर भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी