भारतातील पहिले डिजीटल फेस्ट " प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात"




इस्लामपूर : प्रतिनिधी

येथील प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये स्कुलचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिलाच ‘डिजीटल फेस्ट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतातील महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पंजाब, तेलंगण यांसह २० हून अधिक राज्यातील ५० हून अधिक सीबीएसई शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत रोबोटिक्स विषयाला अनुसरून नाविन्यपूर्ण  प्रकल्प सादर केले. 


प्रारंभी या डिजीटल फेस्टचे उदघाटन डी.वाय.पाटील अग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रतापन के पिल्लाई यांच्याहस्ते झाले. यावेळी स्कुलच्या प्रशासिका सुनिता भोसले-पाटील, सायबर स्क्वेअरच्या प्रमुख अनुषा व्ही. कुमार, सायबर स्क्वेअरचे नॅशनल हेड शनोज पी, एच.के. ट्रेंड्सचे सीईओ हरीकृष्णन हे प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. मधुकुमार ए नायर, उपप्राचार्या सिंधू नायर यांनी विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, आयओटी व सायबर फसवणूक याबद्दल माहिती दिली. दरम्यान, सहभागी झालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या सर्व प्रकल्पाची तज्ञ परीक्षकांद्वारे पाहणी करण्यात आली. त्यातून कॅटेगरी नुसार शाळांचे अनुक्रमे क्रमांक काढण्यात आले. 


डिजीटल फेस्टमधील विजेते खालीलप्रमाणे...

      प्रकाश पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डिजीटल फेस्टमध्ये टेक टॉक कॅटेगरी एकमध्ये ए.बी.एस ग्लोबल स्कूल, त्रीकारीपूर, केरळ, अन्सार इंग्लिश स्कूल, पेरुम्बिलाऊ, केरळ, डीव्हाइन इंटरनॅशनल स्कूल, विटा, महाराष्ट्र तर कॅटेगरी दोनमध्ये अन्सार इंग्लिश स्कूल, पेरुम्बिलाऊ, केरळ, पिस पब्लिक स्कूल, कोट्टकल, केरळ, पोतदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली, महाराष्ट्र यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले. तर वेबसाईट, वेब्स, मोबाईल ॲप्स कॅटेगरी एकमध्ये अन्सार इंग्लिश स्कूल, पेरुम्बिलाऊ, केरळ, अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल, इस्लामपूर,  पोतदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली तर कॅटेगरी दोनमध्ये चिन्मया विद्यालय, कोलाझी, केरळ, पोतदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली, डीव्हाईन इंटरनॅशनल स्कूल, विटा, यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले. तसेच एआय, रोबोटिक्स, आयओटी कॅटेगरी एकमध्ये ग्यांश ग्लोबल स्कूल, पंजाब, व्यास विद्यापीठ, पलक्कड, केरळ, तिस्क इंग्लिश मेडियम स्कूल, केरळ तर कॅटेगरी दोनमध्ये पिस इंटरनॅशनल स्कूल, कोझीकोडी, केरळ, अन्सार इंग्लिश स्कूल, पेरुम्बिलाऊ, केरळ, सिद्धार्थ पब्लिक स्कूल, बोडूप्पल, हैद्राबाद यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले. विजयी शाळांना रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 




Post a Comment

Previous Post Next Post