सांगली प्रतिनिधी
स्व. मदनभाऊ पाटील यानी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. उलट सर्व समाजाना न्याय देऊन त्यानी सामाजिक एकता जपली होती. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत अन्याय करणार नाही. त्यांनाच काँग्रेसचे तिकिट जाहिर होणार आहे. पण जरी हे तिकिट जाहिर झाले नाही तरीसुध्दा कार्यकत्यांचा जनरेटा बघून श्रीमती जयश्रीताई पाटील २८ ऑक्टोंबर रोजी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती मदनभाऊ गटाच्या सिकंदर जमादार, संतोष पाटील, यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पृथ्वीराज पाटील हे आमचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत आणि तेच जयश्रीताई पाटील यांना एबी फॉर्म देणार असल्याचेही कार्यकर्ते यांनी सांगितले.
या पत्रकार बैठकीस माजी महापौर किशोर शहा, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक
फिरोज पठाण, आनंद लेंगरे, शितल लोंढे, सुरज मुल्ला, यांची उपस्थिती होती. सोमवारी सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व समाजातील तमाम वसंतदादा व समस्त काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकत आणि साथ श्रीमती जयश्रीताई यांच्या मागे उभा करावी अस आवाहन ही या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले
आहे. सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या सांगलीची नवीन संकल्पना घेवून बदल घडवण्यासाठी, तसेच सध्याच्या गावठाण आणिविस्तारीत भागाचे प्रश्न सोडवून नागरिकाना सुविधा मिळवून देण्याचे नियोजन करण्यासाठी, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. त्यासाठी समस्त मतदारांनी आपल्याला मतदान करण्यासाठी त्यांचा समोर जाऊ तसेच या बदललेल्या सामाजिक वातावरणात छोट्या सामाजिक घटकाला धीर देण्याची जबाबदारी घेऊन निर्माण झालेल्या सामाजिक तणावाच्या वातावरणात एकीची ताकत निर्माण करण्यासाठी तसेच आपण एक बदललेली विकसीत सांगली निर्माण करण्याची जबाबदारी घेऊन जनतेच्या दारात जाऊ हा निर्धार जयश्रीताई पाटील यांनी केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags
सांगली प्रतिनिधी