सुरेशभाऊ खाडे, सुधीरदादांचा सकल जैन समाजातर्फे सत्कार

सांगली, दि.२७ : सांगली जिल्हा सकल जैन समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सुरेशभाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. येथील कच्ची भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.
जैन आर्थिक विकास महामंडळाची महाराष्ट्र सरकारने नुकतीच स्थापना केली आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तसेच महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तसेच कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, उद्योजक के.के. शहा, रमेश आरवाडे, पृथ्वीराजभैय्या पवार, सौ. नीता केळकर, उद्योजक अण्णासाहेब पाटील, रवींद्र वळवडे, कुमार कोठारी यांच्यासह समस्त जैन समाजातील प्रमुख नेते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वप्निल शहा यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post