सांगली सायबर पोलीस ठाणेकडून नागरीकांचे गहाळ झालेले एकूण अंदाजे ७,५०,०००/- रू किंमतीचे ६० मोबाईल शोधुन सांगली पोलीसांनी नागरीकांना दिली दिवाळी भेट



मा. पोलीस अधीक्षक, श्री. संदीप घुगे मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम यांनी सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ शोध घेवून नागरिकांना ते परत करणेबाबतआदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईल तात्काळ शोध घेणेसाठी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली मोबडे व पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण तसेच अमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते.


  त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ झालेले मोबाईलची तांत्रिक माहीती प्राप्त करून शोध घेतला असता सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे येथे दाखल गहाळ तक्रारी पैकी नागरीकांचे एकूण ७,५०,०००/- रू किंमतीचे ६० मोबाईल फोन शोधून काढण्यात पथकाला यश आले आहे. शोध घेवून मिळालेले मोबाईल खात्री करुन संबंधित नागरीकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु  खोखर मॅडम यांच्या हस्ते परत देण्यात आले आहेत.

सर्व सांगली पोलीस दल निवडनुकीच्या कामास पुर्णपणे व्यस्त असूनहीसायबर पोलीस ठाणेच्या मार्फतीने नागरीकांना ही दिवाळीची भेट देण्यात आली आहे. आपले मोबाईल परत मिळाल्यामुळे संबंधित नागरीकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला.

Post a Comment

Previous Post Next Post