आणि दुसऱ्या बाजूला त्याच महिलांच्या बाबत आक्षेपार्य विधान करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय हे कसलं दुटप्पी धोरण भारतीय जनता पार्टी देशात व महाराष्ट्रात राबवत आहे हे कळत नाही
सर्वप्रथम नगर जिल्ह्यामध्ये काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी बद्दल आक्षेपार्य विधान केल्याबद्दल त्याचा आम्ही आज विष्णू अण्णा भवन येथे वसंतराव देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला
नुकत्याच झालेल्या लोकसभा च्या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये लोकांना भूलथापा मारून जातीपातीत अडकून राजकारण करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आल्यावर आपला जनाधार घटना आहे याची जाणीव झाल्यानंतर येणाऱ्या विधानसभा मध्ये परत सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत
यातीलच एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणून त्यात महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहे ठीक आहे माझ्या बहिणींना पैसे मिळत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंद आहे
मात्र एका बाजूला महिन्याला दीड हजार द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला महिलांची अब्रू वेशीवर टांगायची हा कुठला प्रकार आहे हा आमच्या बहिणीने आता ओळखला पाहिजे
सुसंस्कृत म्हणून आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा ओळखली जाते संतांचा महाराष्ट्र थोरांचा महाराष्ट्र सहकार पंढरीचा महाराष्ट्र मात्र गेल्या काही दिवसांपासून महिलांच्यावर अत्याचार करणारा महाराष्ट्र महिलांची अब्रू वेशीवर टांगणारा महाराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात कोण करत आहे हे माझ्या बहिणींनी आणि भावाने आता ओळखले पाहिजे
ज्या ठिकाणी आपल्या बहिणी सुरक्षित नाही दिवसाढवळ्या अत्याचार करत आहेत त्यातून तीन वर्षाची मुलगी ही सुटली नाही व 70 वर्षाची माझी आई सुद्धा चुकली नाही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला या सर्व बाबींचा मी निषेध व्यक्त करत आहे
राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुसंस्कृतपणा आणि महिलांची सुरक्षितता याबाबत म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न होत आहे तरीसुद्धा मी डगमगून न जाता आम्हाला वारसा तून मिळालेली जबाबदारी निभावून नेण्यासाठी मी सज्ज आहे आपण सर्वजण सज्ज राहूया

Tags
सांगली प्रतिनिधी