शिक्षण घेऊन मोठे व्हा, आई-वडिलांची सेवा करा, व्यसनापासून दूर राहा,दररोज व्यायाम करा.---संतोष पाटील

चांदणी चौक परिसरातील आप्पा कासार प्लॉटमधील आप्पा कासार गणेशोत्सव मंडळाला आज सामाजिक कार्यकर्ते प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी भेट दिली. महाप्रसादचेआयोजित करण्यात आले होते.या वेळेला युवा नेते पै. पृथ्वीराज भैय्या पवार,मराठा स्वराज्या संघाचे राज्याध्यक्ष मा.महादेव बापू साळुंखे,माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी,माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, प्रवक्ते संतोष पाटील अनेक माजी नगरसेवक उपस्थित राहून आप्पा कासार गणेश उत्सव मंडळास भेट देऊन या सर्वांची हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या वेळेला माननीय संतोष पाटील म्हणाले की 1983 साली स्थापन झालेले आप्पा कासार गणेशोत्सव मंडळ सालाबाद प्रमाणे लोक उपयोगी कार्यक्रम आयोजित करून मंडळाची शोभा वाढवली, जर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही या मंडळाने महाप्रसादाचा आयोजन करून सर्वांना रुचकर व स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ दिला.याबद्दल सर्व गणेश भक्तांनी मंडळाचे आभार मानले.भविष्यकाळात या मंडळाला जी काही लागेल ती मदत करण्यास मी तयार आहोत मंडळातील सर्व सभासद कार्यकर्ते यांनी व्यसनापासून दूर राहून चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हा आई-वडिलांची सेवा करा दररोज व्यायाम करून आपली तब्येत तंदुरुस्त ठेवून, उद्योग व्यापार करून घराची प्रगती करा अशी नम्र आव्हान जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माननीय संतोष पाटील यांनी केले. या वेळेलाअध्यक्ष शीरसील बेळगी,उपाध्यक्ष दयानंद आवळे, खजिनदार सुनील कट्टीमनी, सल्लागार ज्ञानेश्वर केंगार, अनिल पुजारी, विजय माधीगर, राकेश मळगी, योगेश गेजगे,अक्षय गेजगे, अविनाश गेजगे, राजू केंगार, आदित्य लोखंडे, व अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित राहून महाप्रसादाचे नीट नेटकी नियोजन केले होते या वेळेला सर्व गणेश भक्तांनी त्यांचे आभार मानले. व सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांनी प्रवक्ते संतोष पाटील यांनी केलेल्या मदतीबद्दलही आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post