वृक्षलागवडी बरोबरच ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापण व पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असुन आरोग्याच्या बाबतीत नागरीकांनी नेहमीच सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे असे मत वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. डॉ. आबासाहेब पवार यांनी व्यक्त केले.
तुजारपूर, ता. वाळवा येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने व शासनाच्या सुचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. तुकाराम सुतार होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेतील मुलांना आनंददायी शिक्षण कसे देता येईल तसेच विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास होऊन चालणार नाही तर त्यांचा गुणात्मक विकास कसा होईल यावरती शिक्षकांसह, पालकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावामध्ये सामुदायिक स्वच्छता मोहीम सतत राबविण्यात आली पाहिजे यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. आबासाहेब पवार यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच श्री. तुकाराम सुतार व उपसरपंच श्री. संदिप पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
गावातील ग्रामपंचायत सह ग्रामस्थ यांच्या वतीने शासन धोरणानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी प्लास्टिक संकलन करण्यात येत आहे. हि बाब भुषनावह आहे. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. साळुंखे यांनी केले. समारंभास ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पाटील, राजश्री शिंदे, ज्योती पाटील, ऐश्वर्या बाबर, रोहन बाबर तसेच सागर पाटील, निलेश बाबर, सुरेखा कदम यांच्या सह सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व आभार ग्रामसेविका सौ. धनश्री पाटील यांनी मानले. तर सुत्रसंचलन श्रीकांत पाटील केले.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी