महानगरपालिकेचा पराक्रम मोठा खड्डा काढून ठेवून महिना झाले जैसे ते जैसे स्थिती लोकहित मंच व स्थानिक नागरिकांनी केला निषेध




सांगलीतील आकाशवाणी पाठीमागे सुभाष नगर येथील महानगरपालिका मोठा खड्डा काढून ठेवून महिना झाले जैसे ते जैसे स्थिती  ठेवला आहे लोकहित मंच व स्थानिक नागरिकांनी केला निषेध 

 सांगली प्रतिनिधी - 

सांगलीतील आकाशवाणीच्या पाठीमागे सुभाष नगर येथे रोडवरतीच महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने भला मोठा खड्डा मध्यभागी काढून रस्त्यावर ठेवला आहे गेले महिनाभर झाले हा खड्डा काढून घोड्यावर ठेवला आहे स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने  नागरिकांच्या तक्रारीकडे केराची टोपली दाखवली आहे पाणीपुरवठा विभागाला कोणतीच गांभीर्य नाही सदर रस्त्यावरती मध्यभागी मोठा खड्डा काढल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना  याचा नाहक  त्रास होत आहे या रोडवरती मुलांना शाळेत जायला अडचण होत आहे नागरिकांच्या तक्रारीची का दखल घेतली जात नाही


याचा स्थानिक नागरिकांनी प्रश्न विचारला आहे याचे उत्तर पाणीपुरवठा देत नाही तरी लोकहित मंच सांगली व स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की येत्या दोन ते तीन दिवसात सदरचा काढलेला रस्ता लवकरात लवकर न दुरुस्ती केल्यास स्थानिक नागरिक तो खड्डा मुजवून टाकणार असा इशारा देण्यात येत आहे यावेळी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे, अशोक सावंत, विलास शिंदे, विकास सूर्यवंशी, आबा सरगर, प्रमोद देशपांडे, मंगेश पेंटर, ललित सुतार, विजय पाटील आदि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post