सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठामार्फत मंगळवार दिनांक ६/८/२०२४ रोजी मोर्च्याचे आयोजन करणेत आलेले आहे. शैक्षणिक व्यासपीठाने आपल्या विविध मागण्या साठी सरकार दरबारी अनेक प्रयत्न करुन देखील सरकारने त्यांच्या मांगणीकडे दुर्लक्ष केले आहे, या मागणीमध्ये प्रमुख्याने शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर असावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अनुदान टप्प्याचा विचार न करता १००% अनुदान देणेत यावे पवित्र पोर्टलवरील शिक्षकांची नियुक्ती करावी, चतुर्थ श्रेणी कर्मचायांची वेतनावर नियुक्ती करावी, रिक्त झालेल्या कर्मच्या-यांच्या जागेवर नवीन कर्मचारी यांची नियुक्ती करावी , इत्यादी मागणीची पुर्तता व्हावी म्हणून या मोर्चाचे नियोजन करणेत आले आहे, या सर्व मागण्या प्रामुख्याने जिल्हा शिक्षण संस्था संघटनेच्या आहेत. म्हणून (संस्था) शिक्षण संस्था संघ पाठीबा जाहीर करीत आहे, असे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले,
Tags
सांगली प्रतिनिधी