येत्या आठ ऑगस्टला वार गुरुवार मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे-पाटील साहेब यांचा सांगली दौरा आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी वाशी मुंबई या ठिकाणी मोर्चाच्या समोर सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याचे व मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली होती, परंतु अद्यापही काही केले नाही त्यामुळे मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील साहेब हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून येथे आठ ऑगस्टला सांगलीच्या दौरावर येणार आहेत.तरी सांगली शहरातील व जिल्ह्यातील सर्व मराठा बंधूसह,इतर बहुजन समाजातील बंधूंना याद्वारे आव्हान करतो की सर्वांनी आठ ऑगस्टला सांगलीमध्ये यावे आठ ऑगस्टला राम मंदिर जवळ, सांगली या ठिकाणी सायंकाळी चार वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून, प्रथम मिरज मध्ये येतील मिरजेतून सांगलीला येतील.या वेळेला मराठा स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या स्वागतासाठी व नियोजनासाठी लाखोने उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत कमीत कमी सात ते दहा लाख लोक येण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून चहा,नाश्ता,पाण्याची, मोफत व्यवस्था केली आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये सांगितले आहे.
Tags
सांगली