इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील येडेमच्छिंद्र,बागणी व तुजारपुर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी एकूण रक्कम रुपये १ कोटी ,९ लाख ,५९ हजार इतका निधी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार च्या विशेष सहकार्यातुन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या विशेष प्रयत्नातुन मंजूर झाल्याची माहीती भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील (दादा) यांनी दिली.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील,भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रविण माने,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले,संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,रणजीत माने,विश्वजीत पाटील आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील (दादा) म्हणाले,गेल्या अडीच वर्षात राज्यातील व केंद्रातील भाजपा व महायुती च्या सरकार च्या माध्यमातुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व इस्लामपुर विधानसभा निवडणूक प्रमुख यांनी इस्लामपुर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयेचा निधी आणला गेला आहे.अनेक विकास कामे पुर्णत्वाकडे गेली आहेत.गेल्या अनेक वर्षापासुन या मतदार संघातील अनेक घटक विकासापासुन वंचित राहीले आहेत,नागरीकांना मुलभुत गरजा मिळत नाहीत अशी अवस्था या मतदार संघाची असताना निशिकांतदादांच्या समोर अनेक गावातील नागरीकांनी विविध समस्या व प्रश्नांची व्यथा मांडल्या.हे प्रश्न व समस्या सोडविण्यात विद्यमान लोकप्रतिनिधी कर्तव्यात कमी पडले आहेत.भविष्यात भाजपा व महायुती सरकार इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील चौफेर विकास साधेल.
येडेमच्छिंद्र येथील प्राथमिक आरोग्य येथे सेवा देणार्या अधिकारी,कर्मचारी यांचे निवासस्थान दुरुस्तीसाठी रक्कम रु.३४ लाख ६२ हजार,बागणी येथील प्राथमिक आरोग्य येथे सेवा देणार्या अधिकारी,कर्मचारी यांचे निवासस्थान दुरुस्तीसाठी रक्कम रु.४० लाख,तुजारपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंतीसाठी रक्कम रु.३४ लाख ९७ हजार इतका निधी मंजुर झाला आहे.
आता पर्यत च्या विकास कामासाठी आलेल्या निधीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार (दादा),महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.सुरेश खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी