घबकवाडी, ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकराव घबक (वहिनी) यांनी आज आपल्या घबकवाडी गावातील भानुदास घबक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी घबकवाडी या विकास सोसायटीस सदिच्छा भेट दिली. व चालू कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सोसायटी चे चेअरमन श्री. खंडोजीराव घबक यांनी संस्थेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत केले.
सोसायटी चे सचिव श्री. शामराव क्षिरसागर यांनी पंचवार्षिक निवडणूकी नंतर सोसायटी च्या दैनंदिन कामकाजाचा आढावा सांगितला. सद्यस्थितीत आपली सोसायटी हि आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना दिसत असल्याचे मत चेअरमन श्री. खंडोजीराव घबक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना चेअरमन श्री. खंडोजीराव घबक म्हणाले कि आज निवडणूक आधिची सोसायटीची वाटचाल सर्वांनी पाहिली आहे व सद्याची प्रगती हि उत्तम रितीने चालत असुन संस्थेच्या प्रगतीचा आलेख हा आगामी काळात आणखी वाढलेला दिसेल. सर्व सभासद यांनी सोसायटीस सहकार्य करावे. व नवीन योजनाचा लाभ घ्यावा. आगामी काळात सोसायटी मार्फत गांवच्या निरनिराळ्या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविणार आहोत असे सांगितले.
Tags
सांगली