उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी साधणार लाडक्या बहिणींशी संवाद माता-भगिनींच्या मनातील जाणून घेणार भावना


इस्लामपूर : प्रतिनिधी

     महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेबद्दल माता-भगिनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दि. १८ ऑगस्ट रोजी राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपाच्या वाळवा  तालुकाध्यक्षा सुरेखा जगताप व इस्लामपूर शहर मंडल अध्यक्षा सुनिता काळे यांनी दिली.


सुरेखा जगताप व सुनिता काळे म्हणाल्या, लाडकी बहीण’ योजनेला व्यापक स्वरूप देण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने अंधेरी पूर्व येथील महापालिकेच्या मैदानात १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता  ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील दोन बहिणी श्री. फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत. 


इस्लामपूर येथेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षणपन दाखवण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या  स्वावलंबी  करण्यासाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ केवळ घोषित केली नाही तर भरीव निधीची तरतूद करून योजना अंमलात आणली आहे. लाडकी बहीण योजना असो वा समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी महायुती सरकारने आणलेल्या योजना असोत, त्यांच्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे.  म्हणूनच या ना त्या प्रकारे या योजनांमध्ये खोडा घालण्याचा हीन प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. बारामतीच्या मोठ्या ताईंना दीड हजाराचे मोल कळणार नाही. मात्र या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनी खूष असून त्या  महायुती सरकारला आशीर्वाद देत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post