प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आ.जयंत पाटील यांचा निषेधकाळ्या फिती लावून डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

इस्लामपूर : प्रतिनिधी
        राजकीय द्वेष मनात ठेवून आ.जयंत पाटील यांनी कोरोना काळात सत्तेचा वापर करत प्रकाश हॉस्पिटल व शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास लावले. या गोष्टीचा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शुक्रवारी भांडाफोड केला. या घटनेचा निषेध म्हणून प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आ.जयंत पाटील यांचा काळ्या फिती लावून व त्यांच्या धिक्काराच्या घोषणा देऊन शनिवारी निषेध नोंदविला. 

प्रकाश शिक्षण मंडळ व कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूपाल गिरीगोसावी, डॉ. विजय पाटील, डॉ.रोहिणी करंबेळकर, डॉ. शिवानंद दोडामनी, एल.आर.पी.आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभिमन्यू पाटील हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. कोरोना काळात जो आम्हाला त्रास झाला होता. तो फक्त आम्हाला नाहीतर आमच्या कुटुंबांना झाला होता. अशी वृत्ती असणारी माणसे राजकारणातून खड्या सारखी बाजूला काढण्याची गरज आहे. सत्तेचा वापर आरोग्य मंदिरांना डाग लावणीसाठी व त्यांना बदनाम करण्यासाठी करीत असतील तर ही वृती समाजाला घातक आहे. कोरोना काळात प्रत्येक जण एकमेकांसाठी पळत होत. पण आ.जयंत पाटील यांची ती मानसिकता नसल्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह या जबाबदार अधिकार्‍याकडुन रुग्णांच्या ,डाॅक्टरांच्या व संस्थेच्या भावनेशी खेळल्याचा प्रकार स्पष्ट झाला . दाखल झालेले गुन्हे हे खोटे आहेत व ते तेव्हाही खोटे होते, हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे या प्रकरणात जे कोणी अधिकारी होते. त्यांची चौकशी त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आम्हा सर्वाशी मागणी आहे.

डॉ.अभिमन्यू पाटील म्हणाले, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका मुलाखतीत आ.जयंत पाटील यांनी कोरोना काळात त्यांच्या मतदारसंघातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची चौकशी करण्यात यावी व त्या संस्थेवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे सांगितले. ही गोष्ट खरच निंदनीय व निषेधार्थ आहे. त्यांच्यामुळे प्रकाश शिक्षण मंडळामधील विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या १५०० हुन अधिक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे. तसेच संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याबद्दल मी व सर्व रुग्णसेवा देणारे डाॅक्टर,सहकारी स्टाफ निषेध नोंदवत आहे.

यावेळी डॉ.संजय पाटील, रणधीर फार्णे, रणजित पाटील, रोहन जाधव, रोहन मोरे, डॉ. राहुल नाकील यांच्यासह प्रकाश शिक्षण मंडळातील डॉक्टर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post