महापालिका क्षेत्रामध्ये अपंगांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे अन्य समाज पाहतो. इतर समाजाबरोबर त्यांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर शासन निर्णयानुसार ताबडतोब त्यांना सेवा सुविधा मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. वारंवार अपंग बांधवांनी आपल्याला निवेदने दिली आहेत. तसेच यापूर्वीही आंदोलनाच्या माध्यमातून ही आवाज उठविला आहे. पण दुर्दैवाने कोणत्याही सेवा सुविधा या महापालिकेकडून मिळत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.
आमच्या खालील मागणी आहेत.मागणी -
1)दिव्यांगांचा 5% राखीव निधी इतर इतर ठिकाणी खर्च केला जातो,तो पुर्णपणे थांबवून सर्वच निधी दिव्यांग बांधवांनच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात यावा...
2) महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करण्यात यावेत.
3) दिव्यांगांना विना अट घरकुल मंजूर करण्यात यावेत.
4) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीनुसार पेन्शन योजना दिव्यांगांना देण्यात यावी. 5) दिव्यांगांना सांगली मिरज कुपवाड क्षेत्रात दिव्यांगांचे विरंगुळा गार्डन करण्यात याव्यात.
6) दिव्यांगांना सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांचे विशेष शौचालय निर्माण करण्यात यावेत.
7) दिव्यांगांनची घरपट्टी कर माफ करण्यात यावेत. 8) दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहानत्मक मानधन दरवर्षी देण्यात यावा.
9) दिव्यांग खेळाडू कोणत्या ही स्पर्धेत सहभागी होत असलेल्यांना जाण्या-येणाचा प्रवास भत्ता देण्यात यावा.
10) महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगानसाठी फिजिओथेरपी सेंटर कायमस्वरूपी अद्यावत चालू करण्यात यावे जेणेकरून दिव्यांगत्व कमी होण्यास मदत होईल
.11) महानगरपालिका क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये,माॅलमध्ये तसेच महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांना 5% आरक्षणानुसार नोकरणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी.
12) महानगरपालिका क्षेत्रातील जे दिव्यांग बेड रेस्ट आहेत त्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. 13) महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांचा ऑनलाईन फोर्टल सर्वे करण्यात यावा.
14) दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात दिव्यांग प्रतिनिधीच कार्यालय प्रमुख घेण्यात यावा. 15) दिव्यांगांचे स्वतंत्र सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात यावे.
16) दिव्यांगांना छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये गाळा उपलब्ध करून मिळावा..
वरील मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात. अन्यथा मा. मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने यापेक्षाही मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.
यावेळी बोलताना माननीय उपायुक्त साहेब यांनी अपंग बांधवांचा राहिलेला 1500/- रू. प्रमाणे उदरनिर्वाह भत्ता आजच्या आज त्यांच्या बँक खात्यात जमा करू असे अस्वस्थ केले
या मोर्चाला मा. मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, शहराध्यक्ष मयूर बांगर, मनपा क्षेत्राध्यक्ष हाजीतोपिक बिडीवाले, विष्णू अण्णा पाटील खरेदी विक्री संघाची व्हाईस चेअरमन सचिन वाडकर, कय्युम पटवेगार, बशीर मुजावर, संकेत आलासे, नितीन भगत, अवधूत गवळी मयुरेश भिसे वैभव चोपडे राहुल मोरे तसेच अपंग संघटनेचे आशा पाटील, रामदास कोळी, जग्गू शेख, संजय कदम, लहू सावंत, शंकर फणसे, राणी कामटे, महादेव कोळी आदी प्रमुख पदाधिकारी व अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
सांगली प्रतिनिधी