100 फुटी रोडला पडलेला खड्ड्याची सखोल चौकशी होण्याची आयुक्तांच्याकडे - लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

    


 लोकहित मंच सांगली व सांगलीकर यांच्या यांच्या विनंतीला मान देऊन मे महिन्याच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या टीमने शंभर फुटी रोडची पाहणी केली तसेच 14 मे च्या दरम्यान माननीय आयुक्त साहेब श्री शुभम गुप्ता यांनी स्वतः संपूर्ण शंभर फुटी राजश्री शाहू महाराज मार्ग या रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याचे बांधकाम मजबूत होण्याबद्दल संबंधितांना सूचना दिल्या होत्या

परंतु त्याने मनापासून केलेल्या या कामाला ठेकेदारांनी सुरुंग लावायचे काम केलेले आहे दोनच महिन्यांमध्ये या रस्त्याच्या अतिशय महत्त्वाच्या चौकात मोठ्याच्या मोठे भगदाड पडले असून यामध्ये दुचाकी अथवा चार चाकी जाऊन मोठा एक्सीडेंट होण्याची व जीवेत आणि वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे एकंदरीतच संपूर्ण सांगली साठी ही अतिशय लाजिरवाणी घटना घडली आहे लोकहित मंच सांगली व समस्त सांगलीकर यांचा प्रतिनिधी या नात्याने मुख्य रस्त्यावर पडलेल्या भगदाडाची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदाराला या गोष्टीसाठी जबाबदार ठरवून दंड करण्यात यावा त्याच्यामार्फत या भागाची पुनर्बांधणी करण्यात यावी


जानेवारी ते मे या कालावधीत रस्त्याच्या मजबुतीची परीक्षण करण्यासाठी लोकहित मंचची मागणी हे अतिशय योग्य आणि रस्त्याच्या कामकाजाच्या दृष्टीने अनुरूप होती हेच या घटनेने स्पष्ट केलेले आहे असे , अध्यक्ष श्री मनोज भिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post